Tag: Dapoli

दापोली समर सायक्लोथॉनच्या नवव्या पर्वाचा उत्साहात समारोप; १०० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग

दापोली : सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित ‘दापोली समर सायक्लोथॉन २०२६’ (सिझन ९) ही स्पर्धा ९ आणि १० मे रोजी उत्साहात…

ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा चव्हाण १०० टक्के गुणांसह दापोली तालुक्यात प्रथम

दापोली: शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलची रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिने एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशासह विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची…

महाबळेश्वरच्या धर्तीवर दापोलीत स्थानिकांसाठी स्वतंत्र सीएनजी रांगेची मागणी

दापोली : शहरात ओढवलेल्या तीव्र सीएनजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, आता महाबळेश्वर शहराचा पॅटर्न दापोलीतही राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिक रिक्षाचालक आणि व्यावसायिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत…

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरेचा बारावीचा निकाल १०० टक्के

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस प्रविष्ट…

संचमान्यतेच्या नव्या निर्णयाविरोधात दापोलीत शिवसेनेचे आंदोलन; शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती

दापोली: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या संचमान्यतेच्या नवीन निर्णयामुळे कोकणातील ग्रामीण शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे. या अन्यायकारक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अतिरिक्त…

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा दापोलीत शिवसेनेकडून जाहीर निषेध

दापोली: नारी शक्तीला बळ देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने संयुक्तपणे हा निषेध…

दापोलीत इको गाडीतून अवैध मद्यवाहतूक; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली : पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बसस्थानक परिसरात विनापरवाना मद्यवाहतूक करणाऱ्या मारुती इको गाडीवर कारवाई केली. वाहतूक कोंडी सोडवत असताना पोलिसांना संशयास्पद वाटलेली इको गाडी (MH 08 R 8636) अडवण्यात आली.…

आंजर्ले कड्यावरचा गणपती मंदिरात भरवस्तीत धाडसी चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी नियोजित कट रचून…

दापोली बाजारपेठ अग्निग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत व मदत करणाऱ्यांचा सत्कार

दापोली : शहरातील बाजारपेठेत ४ एप्रिल २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. यापैकी दोन गरजू दुकानदारांना पुन्हा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी दापोली शहर व्यापारी संघटनेच्या…

दापोलीत बंद घर फोडून १३ लाखांची घरफोडी

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी अशोक गोविंद पवार हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले असताना, १० एप्रिल…