दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील स्वरूप संदीप कान्हेकर या पाचवीच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे.

स्वरूपने या राज्यस्तरीय परीक्षेत दापोली तालुक्यातून तृतीय तर रत्नागिरी जिल्ह्यातून २५ वा क्रमांक पटकावला आहे. तो ब्रिलियंट करिअर अकॅडमी, मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल आणि रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून, त्याच्या या कामगिरीमुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा मोहोर उमटली आहे.

स्वरूपच्या या यशामागे त्याची स्वतःची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे भक्कम पाठबळ आणि ब्रिलियंट करिअर अकॅडमीतील अनुभवी शिक्षकांचे दर्जेदार मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या ब्रिलियंट करिअर अकॅडमीने या निकालाच्या माध्यमातून आपल्या परंपरेत आणखी एका मानाच्या यशाची भर घातली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या वतीने स्वरूप कान्हेकर, त्याचे पालक आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्याच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.