दापोली : टेटवली येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी मोहन भारदे यांच्या सहकार्याने निगडे (ता. दापोली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लागावा, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी अपग्रेड मुख्याध्यापक सदाशिव रसाळ, माजी सैनिक भरत रसाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा रसाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
वह्यांचे वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला. या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल शाळा प्रशासनाच्या वतीने दत्ताजी भारदे यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply