रत्नागिरी : शहरातील आस्था सोशल फाउंडेशन या संस्थेच्या मुलांनी आज दिनांक 8 जुन रोजी परकार हॉस्पिटल समोरील जागेत इमारतीच्या दुतर्फा वृक्षारोपण केले.

यावेळी संस्थेच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी आपण आपल्या मुलांना कशी सृष्टी देणार आहोत? असा प्रश्न पालकांना विचारला.

दिवसेंदिवस वाढणारी उष्णता, पाणी टंचाई, अशुद्ध हवा यावर अतिशय परिणामकारक उपाय म्हणजे वृक्षारोपण होय, मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाडे लावूया मुलांसोबत झाडांचे पण संगोपन करूया असं त्यांनी सांगितले.

या प्रसंगी मुलांचे पालक, मुले, स्थानिक नागरिक, नगर परिषद कर्मचारी आणि आस्थाचे कार्यकर्ते संकेत चाळके, संपदा कांबळे, शिल्पा गोठणकर, मयुरी जाधव, सुप्रिया कांबळे, मानसी ओर्पे, कल्पेश साखरकर उपस्थित होते.