रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे-जांभूळगाव येथील रहिवासी असलेले तोरसकर यांना पोलीस दलात २५ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे.

शिस्तप्रिय आणि कार्यकुशल अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

यापूर्वी तोरसकर यांनी देवरूख येथे दोन महिने पोलीस निरीक्षक म्हणून कार्य केले.

तसेच, त्यांनी मुंबईतील सायन येथे २०११ ते २०१४ पर्यंत पोलीस उपनिरीक्षक, ट्रॉम्बे येथे २०१४ ते २०१७ पर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक, क्राइम ब्रँच युनिट-६ येथे २०१७ ते २०२२ पर्यंत, आणि वडाळा टीटी येथे २०२२ ते २०२३ पर्यंत पोलीस निरीक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.

त्यानंतर २०२३ ते २०२४ मध्ये रत्नागिरी शहरात आणि जिल्हा वाहतूक शाखेत तीन ते चार महिने सेवा बजावली.

पनवेल शहर, कळंबोली यासह इतर ठिकाणीही त्यांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.

दापोलीत पदभार स्वीकारल्यानंतर, महेश तोरसकर यांनी स्थानिक नागरिकांना कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

तसेच, अमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक कठोर करण्याचा आणि सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Anti-Narcotics Campaign, Crime Branch, Dapoli, dapoli police station, devrukh, Kankavli, Law and Order, mahesh Toraskar, mumbai, my kokan, police inspector, ratnagiri, sindhudurg, Traffic Branch

Updated: 29 Jun 2025 6:57 AM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *