रत्नागिरी : अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. कारण रत्नागिरीज सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दृष्टीआड करुन चालणार नाही.

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या सोबत अनिकेत पटवर्धन

महायुतीसह अन्य पक्षातील लोकप्रतिनिधी मंत्री, आमदार, खासदार यांच्याशी त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध हे उत्तम कार्याचे फलितच म्हणावे लागेल. अत्यंत आत्मविश्वासाने नियोजनबद्ध काम करताना प्रत्येक मुद्द्याचा विचार करुन निर्णय घेण्याची क्षमता असल्याचा अनुभव या लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह अनिकेत पटवर्धन

येणार्‍या काळात भाजपा नेते, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पुढील 25 वर्ष रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा, विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्लाच असेल, अशा तर्‍हेचे नियोजन करण्याचा संकल्प अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे.

रविंद्र चव्हाण यांच्यासोबत अनिकेत पटवर्धन

▪️कॉलेज जीवनात उत्तम गुरूंचे मार्गदर्शन लाभले. कॉलेज जीवनात जनरल सेक्रेटरीची (जीएस) निर्विवाद निवडणूक लढवत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात ते यशस्वी ठरले. युवा जीवनात अनेक संघर्ष करीत हॉटेलमध्ये नोकरी संभाळत कॉलेज शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी अनेक पुढार्‍यांशी ओळख होत होती, काम सुरू होते. पण खर्‍या खोट्याची उपजत जाण असलेले अनिकेतजी यांनी आपला पाय कधीही घसरू दिला नाही. कोणत्याही मोहात, व्यसनात ते अडकले गेले नाहीत. सूर्यप्रकाशाइतपत स्वच्छ व्यक्तिमत्व हीच त्यांची खरी ओळख आहे.

▪️भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद भूषवताना अनिकेत पटवर्धन यांनी विविध जनहिताचे विषय हाती घेतले आणि ते पूर्ण ताकदीने पूर्णत्वास नेले. कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी आवाज उठवला. रुग्णांची होणारी परवड, औषधांची असणारी कमतरता, आरोग्य व्यवस्था इ. सुधारण्यासाठी प्रशासनाला नमवित जिल्हा रुग्णालयाच्या अनेक गैर गोष्टी उघड केल्या. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सेवेशी तत्पर अशा उक्तीप्रमाणे जनसेवक युवा नेते म्हणून त्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जाते.

▪️गेले काही वर्षे अनिकेत पटवर्धन बांधकाममंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. या संधीचा उपयोग अनिकेतजींनी लोकसेवेसाठी केला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ते नेहमीच आग्रही असून तशी कामे खात्याकडून करण्यासाठी आग्रही असतात. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत राहून अनिकेतजींनी मंत्रालयीन कामकाज जाणून घेतले. त्यामुळे आता ते स्वतः मंत्रालयीन कामकाज योग्य कौशल्याने हाताळतात. कोणतेही काम असो काम हातावेगळे करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. गावपाड्या पासून थेट वाडी, वस्तीपर्यंत थेट संपर्क त्यांचा दिसून येतो. त्यामुळे मंडणगड ते सावंतवाडीपर्यंत अनिकेत पटवर्धन यांना प्रत्येकजण आपला माणूस म्हणूनच ओळखतो. सर्व पत्रकार मंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

▪️किंगमेकर लोकप्रिय नेते मंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या चाणाक्ष नजरेनं अचूक माणूस हेरला हे नक्की. नवीन आश्वासक चेहरा, उत्कृष्ट नियोजनकार, उत्तम वक्तृत्व कौशल्य, अजातशत्रू या गुणांमुळे मंत्री चव्हाण यांनी हा ब्राह्मण चेहरा समोर आणला आहे. भाजपसाठी पुढील 25 वर्षे निष्ठेने काम करेल, असा हा आश्वासक चेहरा नक्कीच आहे. रत्नागिरीतील एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी भाजपला पुढील 25 वर्षाचे नेतृत्व नक्कीच मिळाले आहे.

▪️अनिकेत पटवर्धन यांचे कार्यक्षेत्र सुरवातीला रत्नागिरी जिल्हा होते, आता ते पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड यासह महाराष्ट्रापर्यंत विस्तारले आहे. एखादं विकासकाम करून घ्यायचे असल्यास ते कौशल्याने करून घेण्याची शिष्टाई त्यांच्याकडे आहे. तसेच प्रशासकिय अधिकारी मग ते जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वाशी असलेली मैत्रीपूर्ण विश्वासक ओळख, सलोख्याचे संबंध यामुळे अनिकेत कोणतेही विकास काम लीलया पार पाडतात.

▪️सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण काम करताना दौर्‍यात त्यांच्या सोबत असणारे अनिकेत पटवर्धन यांनी मुंबई- गोवा महामार्गाचा बारकाईने अभ्यास केला आहे. अडीअडचणी समजून घेत त्यावर पर्याय काढत, महामार्ग लवकर पूर्ण होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बांधकाम खात्यातील ठेकेदारांच्या पेमेंटचा 19 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचे श्रेय श्री. पटवर्धन यांना द्यावे लागेल.

▪️नैसर्गिक फयान वादळात चांगले काम केलेला हाच तो अनिकेत पटवर्धन अशी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी करून दिलेली ओळख. हीच केलेल्या कामांची खरी पोच पावती म्हणावी लागेल. अनिकेत यांची प्रशासकिय कामकाज पद्धती, राजकीय घडमोडीतील त्यांची महत्त्वाची कामगिरी जनसेवा या सर्व देदीप्यमान कामानी त्यांची ओळख अधिकच खुलली आहे. रोखठोक स्वभाव, कामात प्रामाणिकपणा व भाजप हेच मूळ आहे हे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अनिकेतमध्ये हेरले आहे. त्यामुळे कितीही खोट्या-नाट्या तक्रारी झाल्या तरी चव्हाण साहेब ठामपणे वडिलांप्रमाणे विश्वासाने त्यांच्या मागे उभे राहतात व राहतील, असा विश्वास अनिकेत पटवर्धन व्यक्त करतात.

▪️भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांच्याशी अनिकेत पटवर्धन यांची थेट ओळख आहे. तसेच भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, कोकणचे नेते, खासदार नारायण राणे यांच्याशी असलेली ओळख व व्यक्तिगत संबंध आहेत.

▪️अनिकेत पटवर्धन जसे भाजपामध्ये लोकप्रिय आहेत, तसे ते अन्य पक्षाच्या नेत्यांच्याही जवळचे आहेत. राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी व अन्य राजकीय पक्षाच्या नेते मंडळी, लोकप्रतिनिधी यांच्या समवेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. येणार्‍या काळात मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पुढील 25 वर्ष रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा विधानसभा भाजपाचा बालेकिल्लाच असेल अशा तर्‍हेचे नियोजन करण्याचा संकल्प अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केला.

– Advertorial