दापोली : दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पहिल्यांदाच शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दापोलीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये आघाडी होईल अशी सध्या जोरदार चर्चा आहे. या चर्चेमध्ये नक्की किती तथ्य आहे याबद्दल आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण दापोलीमध्ये सध्या याची उत्सुकता लागून राहिली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये आघाडी होणार अशी सूत्रांकडून माहितीही मिळत आहे.

Subscribe : https://youtube.com/c/MyKokanHD

त्याबद्दलची वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

याच विषयावर आम्ही आमदार योगेश कदम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर ते म्हणाले की,

“सध्या मलाच या विषयाबाबत काहीही माहिती नाही.”

अतिशय कमी शब्दांमध्ये आमदार योगेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वरिष्ठांच्या भेटीला दापोलीतून शिष्टमंडळ

दरम्यान शिवसेनेचें एक शिष्टमंडळ मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी गेल्याची माहिती समोर येत आहे. आज मुंबईमध्ये या शिष्टमंडळतील प्रतिनिधी दापोलीची परिस्थिती वरिष्ठ नेत्यांना अवगत करून देणार आहेत.

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर दापोली आणि मंडणगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार की नाही हे स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत शुक्रवारीच निर्णय अपेक्षित होता. पण दापोली शहरातील शिवसैनिकांच्या आग्रहाखातर वरिष्ठांनी भेटीचे निमंत्रण स्वीकारला आहे श. या शिष्टमंडळाबरोबर होणाऱ्या चर्चे पक्षश्रेष्ठी आपला निर्णय जाहीर करणार आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.