राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्याची मागणी करत आंदोलन करण्यासाठी सोमय्या आज दापोली कडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत 40 ते 50 गाड्या भरून शेकडो कार्यकर्ते दापोलीला रवाना झालेत. एक प्रतीकात्मक भला मोठा हातोडाही त्यांच्या हातात आहे. हा हातोडा जनतेच्या भावनेचे प्रतीक असल्याचे सोमय्या म्हणाले.