Tag: ratnagiri

रत्नागिरीत बदलत्या हवामानाचा फटका; पावसाळ्यातच हापूस आंब्याला मोहोर, बागायतदार चिंतेत

रत्नागिरी : जिल्ह्यातील हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा चक्क ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच भर पावसाळ्यातच फुलल्याने आंबा बागायतदार चिंतेत पडले…

कामातील दिरंगाई आणि उदासीनता अजिबात खपवून घेतली जाणार नाही; राज्यमंत्री योगेश कदम यांचा प्रशासनाला कडक इशारा

रत्नागिरी : शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत वेगाने पोहोचलाच पाहिजे, कामातील कोणत्याही प्रकारची ढिलाई आणि प्रशासकीय उदासीनता यापुढे अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा सक्त आणि निर्वाणीचा इशारा गृह…

करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये तणावमुक्तीवर शिक्षक कार्यशाळा; सीबीएसई रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांची भेट

दापोली: तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १६ ऑगस्ट रोजी स्ट्रेस मॅनेजमेंट (तणाव व्यवस्थापन) या विषयावर शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे…

हर्णै नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अहमद बामणे याचा एस.एस.सी परीक्षेत प्रथम क्रमांक; १५ ऑगस्टला भव्य सत्कार

हर्णै : येथील नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अहमद मुबीन बामणे याने एस.एस.सी. परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्तुंग यशाबद्दल १५ ऑगस्टचे औचित्य साधून त्याचा भव्य…

दापोलीत ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी याकुब बाबा दर्गा विश्वस्त कमिटीचे आमरण उपोषण

दापोली : तालुक्यातील उटंबर येथील हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्ग्याच्या ६५३ एकर इनामी जमिनीवरील अतिक्रमण हटवून महसूल अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर हजरत पीर बाबा याकुब सरवरी दर्गा यांचे नाव भोगवटादार…

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत रत्नागिरीत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले…

रत्नागिरीत ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा उत्साह; शहरात सैनिक उद्यान आणि सैनिक भवन उभारण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : ‘आजादी का अमृत महोत्सव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या आवाहनाला साद देत रत्नागिरीत सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. श्रावणाच्या रिमझिम पावसात…

दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

रत्नागिरी : जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्यव्यवसायाचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी…

नॅशनल हायस्कूल दापोलीच्या विद्यार्थ्यांची कोकण मर्चंटाइल बँकेला क्षेत्रभेट

दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शालेय उपक्रमांतर्गत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोकण मर्चंटाइल बँक दापोली येथे नुकतीच क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना…

महसूलमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही प्रशासनात लाचखोरीचा सुळसुळाट; सावर्डे येथील मंडळ अधिकारी ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

चिपळूण: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा होऊन आठवडाही उलटला नाही, तोच प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी किती निगरगट्ट बनले आहेत, याचे ज्वलंत उदाहरण चिपळूण तालुक्यात समोर आले आहे. रत्नागिरी…