रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या आकस्मिक निधनाबद्दल आमदार प्रमोद जठार यांनी तीव्र शोक व्यक्त करत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मिळताच प्रमोद जठार यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि शोकाकुल कुटुंबीयांना धीर दिला.

यावेळी त्यांनी राजेश सावंत यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

सावंत कुटुंबीयांवर कोसळलेल्या या मोठ्या दुःखाच्या प्रसंगी ईश्वर त्यांना या आघातातून सावरण्याचे आत्मिक बळ देवो, अशी प्रार्थना करत या कठीण काळात आपण सावंत कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.