दापोली : शहरा शेजारील जालगाव येथील शारदा क्लासेस, दापोली आणि आर्क एज्यूकेटर्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘नाईट स्काय ओब्जरवेशन’ म्हणजेच ‘अवकाश निरीक्षण सत्राला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. जालगाव येथील श्री शैल्य हॉल येथे हा उपक्रम दिमाखात पार पडला.

या सत्राची सुरुवात दि. १५ एप्रिल संध्याकाळी ६:०० वाजता झाली तर दि. १६ एप्रिल सकाळी ७:०० वाजता पूर्ण झाले. या सत्रामध्ये विद्यार्थी तसेच इतर वयोगटातील इच्छुकांनी आपली हजेरी लावली. एकूण ५५ लोकांनी आकाश निरीक्षणाचा लाभ घेतला.

आर्क एज्यूकेटर्स मुंबईतर्फे, खगोलशास्त्रातील तज्ञ सचिन मिश्रा आणि हिमांशू अगरवाल यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. अत्याधुनिक टेलेस्कोपच्या मदतीने शुक्र, शनी, चंद्र, सूर्य यांच्यासहित अनेक तारका समूहांचे निरीक्षण करण्यात आले. तसेच आकाश निरीक्षणाचा इतिहास, राशी, नक्षत्र, ताऱ्यांची नावे या सर्व गोष्टी प्रथम सत्रामध्ये समजून घेतल्या. नंतर त्यावर आधारित खेळांनाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कॅम्प साईट वर उभे केलेलं टेन्ट विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा विषय होता. सहभागिंनी मोबाईल फोन मधून ॲस्ट्रोफोटोगग्राफी कशी करायची याचाही अभ्यास केला.

आकाश निरीक्षण उत्तमरीत्या पार पडले व पुन्हा नक्की आकाश निरीक्षण करायला आवडेल असे मत सर्वच सहभागी लोकांनी मांडले.

या सत्रामुळे मुलांमध्ये आकाश निरीक्षणाची ओढ व कुतूहल अजून निर्माण झाले, ही बाब फार समधानाची आहे अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक शारदा क्लासेसच्या शिक्षकांनी व्यक्त केली.