दापोली : शहरातील रीनाज ब्युटी सलोन स्पा अकॅडमी मधील रीना राजेंद्र देवरुखकर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ यश मिळवत होत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी भूमी राजेंद्र देवरुखकर हिने लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे आयोजित मेकअप स्पर्धेमध्ये 35 मिनिटात पहिल्याच प्रयत्नात मेकअप केला आणि यश संपादन केले.

ही स्पर्धा दि 16 डिसेंबर 2022 रोजी अहमदाबाद साबरमती आश्रम इथं झाली होती. याचा निकाल 10 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाला असून भूमी देवरुखकर हिने लहान वयामध्येच दापोलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.

दापोलीमधील सर्व स्तरावरून भूमीचं कौतुक होत आहे. तिच्या या यशाचं श्रेय तिची आई रीना देवरूखकर यांना जातं.

रीनाज ब्युटी सलोन स्पा या अकॅडमी मधून बऱ्याच विद्यार्थिनी घडत आहेत व आपले करिअर करीत आहेत. अशाच प्रकारे आणखी काही विद्यार्थिनींनी आपले करिअर करून असेच रेकॉर्ड बनवावेत यासाठी रीनाज ब्युटी सलून स्पा अकॅडमी सदैव आपल्या बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया रीना देवरूखकर यांनी दिली.

याप्रसंगी पर्यटन व्यवसायिक महासंघ रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने भूमी राजेंद्र देवरुखकर हिचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पर्यटन व्यवसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष शसंजय काशीद, तालुकाध्यक्ष बाळासाहेब नकाते, जिल्हा खजिनदार, पूजा साखळकर, तालुका खजिनदार कविता बोधे, पर्यटन व्यवसायिक महासंघ सदस्य व हॉटेल बिजनेस डेव्हलपमेंट अँड कन्सल्टंट विद्यमान गुरव, रिनाज ब्युटी पार्लर अकॅडमीच्या रीना देवरुखकर आदी उपस्थित होते