रत्नागिरी : जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणूक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बोलबाला बघायला मिळाला. 51 ग्रामपंचायतींपैकी 24 ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं बाजी मारली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाला केवळ सात ग्रामपंचायतमध्ये यश मिळवता आलं आहे. तर राष्ट्रवादीनं 2, भाजपानं 1 आणि 17 ग्रामपंचायतीवर गाव पॅनलनं बाजी मारली आहे. गाव पॅनल म्हणून निवडून आलेल्या या ग्रामपंचायती कोणाकडे जातील याची उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये आहे.



रत्नागिरी लांजा राजापूर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांचा करिष्मा बघायला मिळाला. राजन साळवी यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज होऊन रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी मध्ये तब्बल 18 जागांवर उद्धव ठाकरे गटाचा दबदबा बघायला मिळाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक (तालुका निहाय)

रत्नागिरी तालुका
1 ) शिरगांव – सरपंच महाविकास आघाडी
2 ) फणसोप – ठाकरे गट
3 ) चरवेली – गाव पॅनल (( बिनविरोध ))
4 ) पोमेंडी बुद्रुक – ठाकरे गट

लांजा तालुका
1 ) शिरवली – ठाकरे गट (( बिनविरोध ))
2 ) रिंगणे – गाव पॅनल
3 ) कोचरी – ठाकरे गट (( बिनविरोध ))
4 ) गवाणे – ठाकरे गट
5 ) वेरवली – ठाकरे गट
6 ) देवधे – ठाकरे गट
7 ) कोर्ले – गाव पॅनल
8 ) गोवीळ – राष्ट्रवादी काँग्रेस
9 ) प्रभानवल्ली – गाव पॅनल
10 ) व्हेळ – राष्ट्रवादी काँग्रेस
11 ) कोंड्ये – ठाकरे गट
12 ) झापडे – ठाकरे गट
13 ) उपळे – गाव पॅनल
14 ) हर्चे – ठाकरे गट
15 ) कोलधे – गाव पॅनल

राजापूर तालुका
1 ) सागवे – ठाकरे गट
2 ) देवाचे गोठणे – गाव पॅनल(( बिनविरोध ))
3 ) वडदहसोळ – ठाकरे गट (( बिन विरोध ))
4 ) आंगले – ठाकरे गट
5 ) भालावली – भाजप
6 ) केळवली -ठाकरे गट (( बिनविरोध))
7 ) मूर -ठाकरे गट (( बिनविरोध ))
8 ) राजवाडी – गाव पॅनल
9 ) मोगरे – ठाकरे गट (( बिनविरोध ))
10 ) कोंडये तर्फे सौदळ – ठाकरे गट

संगमेश्वर तालुका
1 ) कोंड असुर्डे – ठाकरे गट
2 ) आंबेड बुद्रुक – गाव पॅनल
3 ) असुर्डे – ठाकरे गट

चिपळूण तालुका
1 ) फोपळी – गाव पॅनल ((बिनविरोध ))

गुहागर तालुका
1 ) अंजनवेल – ठाकरे गट
2 ) वेलदूर – ठाकरे गट
3 ) वेळंब -गाव पॅनल (( बिनविरोध ))
4 ) परचुरी – गाव पॅनल (( बिनविरोध ))
5 ) छिंद्रावळे – गाव पॅनल

खेड तालुका
1 ) असगणी – ठाकरे गट
2 ) आस्तान – शिंदे गट
3 ) नांदगाव – ठाकरे गट
4 ) सुसेरी – गाव पॅनल
5 ) तळघर – शिंदे गट (( बिनविरोध ))
6 ) वडगाव – शिंदे गट (( बिनविरोध ))
7 ) देवघर – शिंदे गट

दापोली तालुका
1 ) इनामपांगरी – गाव पॅनल
2 ) गावतळे – गाव पॅनल
3 ) फणसू – शिंदे गट (( बिनविरोध ))
4 ) नवसे – गाव पॅनल (( बिनविरोध ))

मंडणगड तालुका
1 ) घराडी – शिंदे गट
2 ) निगडी – शिंदे गटरत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची फायनल आकडेवारी

जिल्हा – रत्नागिरी
एकुण ग्रामपंचायत-51
मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 36
बिनविरोध ग्रामपंचायती-
निकाल खालील प्रमाणे
शिवसेना – 24
शिंदे गट – 07
भाजप – 01
राष्ट्रवादी – 02
काँग्रेस – 00
इतर -17