सुधीर तलाठी यांची उपाध्यक्षपदी निवड

राकेश कोटिया यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राकेश कोटिया यांनी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी कायमच प्रयत्न केले आहेत.

सहकार क्षेत्रात श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेचं नाव आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदरानं घेतलं जातं. राकेश कोटिया आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संस्था भरभराटीस यावी यासाठी सातत्याने झटताना दिसत आहेत.

त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील त्यांच्यावर सतत विश्वास दाखवला आहे. याचाच परिपाक म्हणून कोटिया यांची पाचव्यांदा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.

तर उपाध्यक्षपदी सुधीर तलाठी यांची निवड झाली आहे. सुधीर तलाठी देखील या संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात देखील संस्था उन्नती साधत आहे.

राकेश कोटिया आणि सुधीर तलाठी यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांचं सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.