रायगड पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला!
रायगड : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालक मंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. रायगडचं पालकमंत्रिपद हे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या…
पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने पटकावले महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांच्या इनडोअर टर्फ विकेट टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने विजेतेपद पटकावले आहे. आर्टिफिशिअल टर्फ मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती,…
मुरुगवाड्यात शिंगोत्सवाची धूम! मानाच्या शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात दाखल
रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा ग्रामस्थांनी शिंगोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणली. रविवारची सुट्टी असल्याने, फागपंचमीच्या दोन दिवस आधीच ही होळी आणण्यात आली. यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे…
रत्नागिरी पोलीस दलाचा ‘जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिन’ यशस्वी; अनेक कौटुंबिक वादांवर तोडगा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘७ कलमी कृती कार्यक्रमा’ अंतर्गत, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिना’चे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी…
विनायक राऊत यांचे राजन साळवींवर गंभीर आरोप
विनायक राऊत यांनी माजी आमदार राजन साळवी यांच्यावर रिफायनरी प्रकल्पामुळे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
प्राचार्यांची ८.८८ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
दापोली (रत्नागिरी): दापोली सीनियर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार ४२६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात धीरज अग्रवाल आणि विकास प्रभू या दोन…
पालगड येथे भीषण अपघात, ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पालगड (दापोली): शिरखळ पुलाजवळ आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विकास नरहर काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पालगड येथील…
खेड पोलिसांच्या वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांचा जेसीआय खेडकडून सन्मान
खेड: “सॅल्यूट द सायलेंट” या उपक्रमांतर्गत जेसीआय खेडने खेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना दरवर्षी जेसीआयकडून या उपक्रमांतर्गत गौरविण्यात येते.…
कोकण रेल्वेचा दिल्लीत दुहेरी सन्मान: गव्हर्नन्स नाऊ कडून दोन मानाचे पुरस्कार!
नवी दिल्ली : कोकण रेल्वेला गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कोकण रेल्वेला ‘नेतृत्व पुरस्कार’ (Leadership Award) आणि ‘पायाभूत सुविधा नेतृत्व पुरस्कार’ (Infrastructure leadership Award)…
रत्नागिरीत कचऱ्याची समस्या गंभीर: साळवी स्टॉपवर दरदिवशी २० टन कचरा, नवीन जागा रखडली
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे पाणीपुरवठा टाकीजवळ दरदिवशी सुमारे वीस टनांहून अधिक ओला-सुका कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या…
