Virus

बारुळ : मुलगा झाल्याच्या आनंदात एका युवकानं गावात व मित्रपरिवरात पेढे वाटले. पण तो कोरोना बाधित असल्याचं समोर आल्यानं पेढा खाणारे 116 जण होम क्यारंटाईन झाले आहेत.

सर्वांनी बारुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, अफवा पसरवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

कोरोनाच्या काळात कुणीही अति उत्साहीपणा दाखवणं अंगाशी येऊ शकतं हेच या बातमीवरून दिसून येत आहे. या घटनेच्या माध्यमातून सर्वांनी धडा घेणं आवश्यक आहे.

Advertise