दापोली : तालुका आरोग्य विभागातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारी म्हणून काही दिवस रुग्ण न तपासण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकह अनेक कर्मचारी आले आहेत. सर्वांचे स्वॅब देखील घेतले गेले आहेत. या स्वॅबचे जो पर्यंत अहवाल येत नाहीत तो पर्यंत रुग्ण न तापसण्याचा निर्णय विभागामार्फत घेतला गेला आहे.

हेही वाचा – दापोलीत 5 तर मंडणगड मध्ये 4 नवे कोरोना रुग्ण

तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्वतःला घरातच विलग करून घेतलं आहे. त्याचबरोबर काही दिवस प्रशासकीय कामकाज घरूनच पाहणार आहेत. जनतेची सेवा करताना आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आंजर्ले येथील आरोग्य सेवकांचा कोरोनाशी लढताना मृत्यही झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाला सहकार्य करणं आवश्यक आहे. तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. शिव बिरादार यांनी ‘माय कोकण’शी बोलताना जनतेला काही खबरदारीचा उपाययोजना सांगितल्या आहेत,

डॉ. शिवा बिरादार, तालुका आरोग्य अधिकारी

सर्व नागरिकांनी कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून शासनाने दिलेले निर्देश पाळले पाहिजेत. बाहेर पडताना मास्क आणि गॉगल वापरणं खूप आवश्यक आहे. कोरोनाचे विषाणू नाक, तोंड आणि डोळ्यामार्फत प्रवेश करण्याचा धोका सर्वाधिक असतो. खबरदारी घेऊनच आपण कोरोनाचा पराभव करू शकतो.

Ad.