मुंबई:- कल्याण-डोंबिवली मधील एका 33 वर्षाच्या तरुणाला कोव्हिड 19 विषाणूच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

केपटाऊन-दुबई ते नवी दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत हा तरुण आला होता. सौम्य ताप आणि खोकला अशी लक्षणं दिसल्यावर त्याची कोव्हिड चाचणी घेण्यात आली.

त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. जनुकीय तपासणी केली असता त्यास ओमीक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या वर कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.