बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

पॅरासेलींग करणाऱ्या दोन महिला समुद्रात कोसळल्या

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना समोर आली आहे

पॅरासेलींग करणाऱ्या दोन महिला समुद्रात कोसळल्या

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना समोर आली आहे.

सुदैवाने या दोन्ही महिला बचावल्या आहेत. पण यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील साकीनाका येथील काहीजण सहकुटुंब अलिबागला फिरायला आले होते. वरसोली समुद्रकिनारी फिरत असताना त्यातील सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलींग करण्यासाठी गेल्या.

त्या पहिल्यांदाच पॅरासेलींगचा अनुभव घेत होत्या. पॅरासेलींग करताना अचानक दोर तुटल्याने त्या दोघी खाली पाण्यात कोसळल्या त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरूप बाहेर काढले.

two women broke the rope and fell into the sea., While parasailing on the beach at Versoli in Alibag taluka

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *