राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ही लढाई आता संपली आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. यामध्ये संस्थापक शरद पवारांना जबर राजकीय धक्का बसला आहे. अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जनतेमध्ये उत्सुकता होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांना मिळणार की अजित पवारांना अखेर ही उत्सुकता संपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाला आहे.

पवार गटामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना हा मोठा झटका मानला जात आहे.