दापोली : “रंजन-विकास केंद्रा”च्या माझ्या एका तरूण कार्यकर्त्याचं तथा मित्राचं “100% माणसाचं” अकाली निधन झालं. आमचं नातं अनेक सीमा ओलांडून पार असणारं. त्याच्याविषयी न साहवणारं.

बल्यासारख्या “तरूण माणसासाठी” अशा प्रकारचं मागणं मागावं लागावं हे आपणां सर्वांसाठीच अतीव दु:खाचं आहे पण, गतात्म्यास सद्गती लाभो हे ईश्वराकडे मागणं.

अनेक भावूक आठवणींपैकी एक आपणा सर्वांचीच एक आठवण डोळे पाणावते आहे.

आपल्या बाल नाट्य महोत्सव समारंभाच्या समारोपावेळी पालक आणि श्रोते प्रेक्षक यांना उद्देशून मी मनोगतामध्ये असं म्हटलं होतं की, “चिंध्या लेऊन सोनं विकायला बसलो तर कोणी फिरके ना आणि सोनं लेऊन चिंध्या विकायला बसलो तर गर्दी हटता हटेना”.

त्यावेळी बल्या प्रचंड भावुक झालेला होता, हे वाक्य त्या शायर-गझलीयाच्या कायम स्मरणात होतं आणि ते तो मला वेळोवेळी अनेकदा ऐकवत असे.

ते त्याच्या काळजाला भिडलं होतं असं म्हणून मला “तेच” ऐकवायचा. त्या वेळचे त्याचे भाव आणि शब्द त्याच्या गतात्म्यासमोर उभा राहिल्यानंतर नकळतपणे मला आठवले ते.

– विष्णू सोमण / प्रल्हाद मालशे