रत्नागिरी: 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सरकारी महिला वकील आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या अनेक खटल्यांमध्ये गुन्हे शाबीती करिता कायदेविषयक सहाय्य पुरविणाऱ्या तसेच सरकारी पक्षाची बाजू उत्तमरित्या न्यायालयासमोर मांडून गुन्हे शाबीतीचे प्रमाण वाढविण्यास मोलाचे सहकार्य केले म्हणून, मेघना नलावडे (विशेष सरकारी अभियोक्ता, रत्नागिरी), वर्षा प्रभू (सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, रत्नागिटी), प्रज्ञा तिवरेकर (विशेष सहा. सरकारी अभियोक्ता, रत्नागिरी) आणि प्रिया लोवलेकर (कायदे तज्ञ व बाल न्याय मंडळ सदस्या, रत्नागिरी) यांचा शाल-श्रीफळ, गुलाबाचे रोप व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी, महिला व बालकांसंबंधी गुन्ह्यांच्या तपासादरम्यान अत्यंत संवेदनशीलतेने व सदहृदयतेने हातळणेबाबत सूचना दिल्या व रत्नागिरी जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणेबाबतही आवाहन केले.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सत्कार समारंभा दरम्यान, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल असणाऱ्या विविध महिलां संदर्भातील गुन्ह्यांची उकल व तपास करण्यात, मुद्देमाल हस्तगत करण्यात, आरोपी पकडण्यात गुन्हे शाबीती करण्यात तसेच मिळालेले गावठी बॉम्ब देखील नष्ट करण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खालील नमूद महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा शाल-श्रीफळ, गुलाबाचे टोप व प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
1) श्रीमती वैशाली अडकुट, स.पो.नि, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे
2) तेजस्विनी पाटील, स.पो.नि., लांजा पोलीस ठाणे
3) प्राप्ती मंचेकर, स.पो.नि., बी.डी.डी.एस, रत्नागिरी
4) गायत्री पाटील, पोऊनि, महिला सुरक्षा कक्ष, रत्नागिरी
5) मुक्ता भोसले, पोऊनि, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे
6) शीतल पाटील, पोऊनि, नियंत्रण कक्ष रत्नागिरी
7) क्रांति पाटील, पोऊनि, जयगड पोलीस ठाणे
8) पूजा चव्हाण, पोऊनि, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे
9) सुप्रिया मोरे, मपोहवा/878 चिपळूण पोलीस ठाणे
या सत्कार समारंभानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक धनजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “निर्भया” या महिला विशेष माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
निर्भया या पुस्तिके मध्ये महिलांसंबंधीचे कायदे, नियम व तरतुदी, विविध शासकीय योजना व उपक्रम समित्या, संपर्क व हेल्पलाइन क्रमांक, घ्यावयाची दक्षता तसेच इतर विशेष माहिती देखील उपलब्ध आहे. तसेच ही पुस्तिका जनहितार्थ व विनामुल्य वितरीत करण्यात येत आहे.
महिला व बालकांसंबंधी गुन्ह्यांच्या तपासादरम्यान अत्यंत संवेदनशीलतेने व सदहृदयतेने हातळणेबाबत मी सर्व पोलीसांना सूचना दिल्या आहेत व. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणेबाबतही आवाहन देखील केलं आहे.
धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक – रत्नागिरी