दापोली : पुणे बालेवाडी येथे सुरू असलेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान आयोजित युवा कबड्डी सीरीज 2024 स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून दापोली तालुक्यातील जेष्ठ पंच सत्यवान अनंत दळवी यांची सामनाधिकारी म्हणून निवड झाली होती.

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनकडून रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ कबड्डी पंच सत्यवान दळवी यांनी आपली निवड सार्थ ठरवून उत्तम कामगिरी करत ‘बेस्ट टेक्निकल ऑफिशियल ऑफ द डे’ हा सन्मान सुद्धा प्राप्त केला.

रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंचप्रमुख, सामनाधिकारी, खेळाडूंकडून सामनाधिकारी सत्यवान दळवी यांच्या उत्तम कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.