दापोली साई रिसॉर्ट प्रकरण कदमांना हायकोर्टाचा दिलासा  नाही

मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना उच्च न्यायालयाने जामीन देण्यास बुधवारी
नकार दिला. या निर्णयाविरोधात कदम आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

सदानंद कदम यांना मार्चमध्ये अटक करण्यात आली होती आणि ऑक्टोबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाला कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल 1 डिसेंबर रोजी राखून ठेवला होता. तो बुधवारी जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार दिला.

साई रिसॉर्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण ना विकास क्षेत्रमधील साई रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने न्यायालयात या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद कदम आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत.