दापोली : शहरातील एसटी बुक स्टॉलचे मालक व सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स बळवंत क्रांतीकुमार फाटक यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 10.30 वा. राहत्या घरून निघणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

बळवंत एक जिंदा दिल व्यक्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना गझल आणि कवितांमध्ये प्रचंड रस होता. एक दर्दी व्यक्ती म्हणून त्यांची दापोलीमध्ये ख्याती होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने एकेनांना धक्का बसला आहे.

दापोलीतील विवध मान्यवरांनी बळवंत फाटक यांना आदरांजली वाहिली आहे.