दापोली : शहरातील लोकमान्य हायस्कूल चा निकाल 97.29 टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

शाळेतील कीर्ती संतराम कुशवाहा (424 /500 पैकी)  84.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, द्वितीय क्रमांक श्रावणी अविनाश साबळे हिने (362 /500 गुण) 72.40% गुण मिळवून मिळवला आहे तर तृतीय क्रमांक श्रेया नरेश शिगवण हिने (356 /500गुण) 71.20% गुण मिळवून पटकावला आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे लोकमान्य सेवाभावी प्रतिष्ठान कराड दापोली पदाधिकारी, लोकमान्य हायस्कूल दापोली मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सर्वांनी अभिनंदन केले आहे.