दापोली : दापोली शहरातील ज्ञानदीप विदयामंदिर शाळेचा  एस.एस.सी मार्च २०२४ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून प्रशालेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

शाळेतील श्रावणी उदय बंगाल आणि पारस सचिन बंदसोडे याने 97.00 गुण मिळवून दोघांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच तनुश्री अजित थोरे हिने 96.60 व्दितीय कमांक मिळवला आहे. तर अंशुल महेश सोमण याने 96.40 तृतीय कमांक मिळवला आहे.

यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सरोज मेहता, उपाध्यक्षा शांता सहस्त्रबुद्धे, संस्था सेक्रेटरी सुजय मेहता, संस्था सहसेकेटरी विश्वासकाका कदम, खजिनदार हसमूख जैन, संस्था संचालक, विनय महाडीक विजय पवार, अजय मेहता, रविंद्र कालेकर, सुहासिनी कोपरकर, गोपीनाथ महाडिक, शुभांगी गांधी, अशोक सावंत, गोविंद पवार, सुयोग मेहता, संकेत मेहता, डॉ. अनिल शेठ, मुख्याध्यापक मधुकर मोरे यांनी यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.