रत्नागिरी : गेल्या काही दिवसापासुन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये Social media जसे Whatsapp, Facebook, twitter इ. समाजमाध्यमांद्वारे शालेय मुले पळविणारी टोळी दाखल / सक्रिय / तीन मुलांचे अपहरण वगैरे छायाचित्रे बातम्या video / audio clip काही लोकांकडून व्हायरल होताना दिसून येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा कोणत्याही टोळ्या सक्रिय व दाखल झाल्याबाबतची तक्रार अथवा खात्रीशीर माहिती अगर अशा प्रकारातून अपहरण झाल्याची तक्रार झालेली नाही.

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा खात्री झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या video / audio clip व्हायरल झाल्यास त्यास समाजमाध्यमांद्वारे अथवा नागरिकांकडून दुजोरा अशा प्रकारचे video audio clip पसरविणे, पुढे पाठविणे इ. देण्यात येवू नये जेणेकरुन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरेल.

वरील विषयासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळाल्यास रत्नागिरी पोलीस कंट्रोल रुम दुरध्वनी क्रमांक 02352-222222 तसेच अतितात्काळ हेल्पलाईन डायल – 112 वर संपर्क करावा.

तसेच सदरच्या अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरीता नागरिकांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.

अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास अथवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्याबाबतची माहिती त्वरीत पोलीसांना द्यावी.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. जर कोणी जाणिवपुर्वक असे संदेश पसरवित असेल तर संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.