दापोली : दापोली नगरपंचायतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचे पुत्र फैजान रखांगे यांना जामीन मंजूर झाला आहे. रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास फैजान यांना अटक करण्यात आली होती. कोर्टामध्ये हजर केल्यावर पोलीसांनी मागितलेली पोलीस कोठली कोर्टानं नाकारत न्यायालयीन कोठडी देत जामीन मंजूर केला.

नगर पंचायतीमधील निलंबित कर्मचारी दीपक सावंत यांनी फैजान रखांगे यांना व्यवसायासाठी पैसे दिल्या प्रकरणी ही कारवाई झाली होती!