दापोली : राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या हस्ते पॅपिलॉन दापोली महोत्सवाचं  उदघाटन गुरुवारी सायंकाळी 7 वाजता  पार पडलं. दिनांक 17 ते 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत हा महोत्सव दापोली आझाद मैदानात सुरू राहणार आहे. 

दापोलीसह कोकणच्या सांस्कृतिक  आणि औद्योगिक चळवळीत भर घालणारा आणि बचतगटांपासून लघु उद्योजकांना प्रेरणा देणारा सलग 11 दिवसांचा पॅपिलॉन महोत्सव भारतरत्नांच्या भूमीत दापोलीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्तानं जिल्ह्यातील  नवोदित  कलाकारांच्या कलागुणांना पॅपिलॉन महोत्सवात व्यासपीठ दिले जाणार आहे.  कोकणातील कोळी नृत्य , जाखडी, गोमुचा नाच, नकटा/संकासुर यांचे खेळ महोत्सवात असणार आहेत. महिलांसाठी होममिनिस्टर ,संगीत खुर्ची, फॅशन शो , रेकॉर्ड डान्स यांच्या सह दापोली तील युवतींमधून मिस पॅपिलॉन 2022 ही निवडण्यात येणार आहे.   

दररोज सेल्फी स्पर्धा ही घेण्यात येणार असून उत्तम सेल्फी काढणाऱ्याला बक्षीस ही दिले जाणार आहे. प्रथम च कोकणवासीयांसाठी मॅजिक शो आणि पहिल्यांदा रोबोटिक प्राणी आणि पक्ष्यांचे प्रदर्शन ही भरविण्यात आले आहे.. सर्वसामान्य जनतेसाठी चालणाऱ्या या महामेळ्यात आज पहिल्याच दिवशी दापोलीकरांनी मोठी गर्दी केली होती. तर लहान मुलांनी स्टेजवर आपापले परफॉर्मस ही सादर केले.

आपल्या शुभेच्छापर भाषणात दादा इदाते यांनी या नावीन्यपूर्ण महोत्सवाचे कौतुक करतानाच दापोलीकरांसाठी मोठी संधी असल्याचं नमूद केले.

या उद्घाटनाप्रसंगी पॅपिलॉन उद्योग समूहाचे चेअरमन रमेश जोशी, रत्नागिरी महोत्सवचे सलीम पेटकर, समाजसेविका मुदुला निंबकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मेकअपआर्टिस्ट रीना देवरुखकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रस्ताविक प्रा. कैलास यांनी यांनी केले तर उद्घाटनाला जेष्ठ कवी सुदेश मालवणकर, प्रा. कुणाल मंडलिक यांच्या सॊबत अनेक पत्रकार ही उपस्थित होते.