रत्नागिरी : दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे शबे कद्र (लैलतुल कद्र)चे औचित्य साधून मदनी मरकज फैजाने अत्तार कोकणनगर येथे ईजितमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रवचन (बयान) अल्ताफ कूरेशी यांनी केले.

सध्या देशभरात रमजान पवित्र रमजान महिना सुरू आहे . रमजान महीन्याचे सध्या तिसरे पर्व सुरू आहे दरवर्षी मुस्लिम बांधव रमजान पर्वाचा २६ वा उपवास सोडल्यानंतर शब ए कद्र साजरी करतात.

या रात्रीच्या औचित्यावर मशिदींमधून विविध धार्मिक कार्यक्रम होतात. समाजबांधव एकत्रितपणे कुराणपठण करतात आणि अल्लाहच्या दरबारी दुवा मागतात.या रात्रीला लैलतुल कद्र असे पण म्हटले जाते.

या वेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे सर्व छोटे रोजेदार यांचे स्वागत अल्ताफ कूरेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी संस्थेचे सदस्य अल्ताफ कूरेशी, उवेज जरीवाला, अकील मेमन तसेच इतर सदस्य आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.