दापोली : दापोली अर्बन बँकेच्या माजी संचालिका ॲड. रमा बेलोसे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

रमा बेलोसे पालगड येथील पूज्य सानेगुरुजी विद्यामंदिर या संस्थेच्या विद्यमान संचालिकाही आहेत. सामाजिक कार्यामध्ये दापोलीमध्ये त्यांचं काम चांगलं आहे. त्यांचे पती ॲड. सुशांत बेलोसे हे दापोलीतील सुप्रसिद्ध वकील आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी प्रदेशाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते मुजीब रुमाणे, प्रदेश युवक सरचिटणीस अजय बिरवटकर, रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, मंडणगड अध्यक्ष मुझफ्फर  मुकादम, महिला तालुकाध्यक्ष विनिता शिगवण, मंडणगड नगराध्यक्षा सोनल बेर्डे,  प्रियांका लेंडे, नम्रता शिगवण,  विद्या बुरटे, मेघा खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.