दापोलीतील कोंकणी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित फातिमा महंमद परकार प्रायमरी स्कूल व अ मजीद अ बुरोंडकर हायस्कूल अँड जुनियर कॉलेज दापोली व जिल्हा परिषेद उर्दू शाळा दापोली स्कूलच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने तिरंगा रॅली आज शनिवारी उत्साहात संपन्न झाली.

विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने गुरुजी उद्यान, शिवाजी चौकामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग दर्शवून हर घर तिरंगा आणि भारत मातेच्या जयघोषाने सर्व वातावरण देशभक्तिपर केले.

दापोली पंचायत समितीचे नोडल ऑफिसर ताजुद्दीन परकार, दापोली तालुका कला क्रीडा मंचाचे अध्यक्ष व केंद्रप्रमुख प्रवीण काटकर, दापोली नगरपंचयात दापोलीचे कर्मचारी , सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, दापोली पोलिस स्टेशनचे अधिकारी, दापोली बसस्थानकाचे कर्मचारी, तसेच जिल्हा उपविभागीय रुग्णालयातील सेवक वर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, मार्गदर्शन केले व मुलांचे कौतुक केले. माय कोकण सप्ताहिकाचे पत्रकार शमशाद खान यांनी सहभागी होऊन मुलांचे कौतुक केले.

रॅलीमधील देशभक्तिपर समुहगीत, विविध वेषभूषामधील सहभागी विद्यार्थी यांचे अनेकांनी छायाचित्रण केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष इकबाल परकार , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, श्री अशरफ अंजर्लेकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बानु खोत , जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते.