रत्नागिरी :- कोरोना विषाणू जिल्ह्यातील प्रमाण कमी होत असताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आता जिल्ह्यात लागू झालेले निर्बंध शिथिल केले आहेत.
सर्व पर्यटन स्थळे खुली होणार असून कार्यक्रमांनाही जास्त संख्येची परवानगी मिळाली आहे.
सर्व पर्यटन स्थळे : ऑनलाइन तिकीट वितरीत करणारी जिल्हयातील सर्व पर्यटन स्थळे त्यांचे नियमित वेळेनुसार खुली राहतील . पर्यटन स्थळांना भेट देणा-या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील . कोविड १९ साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी ठराविक वेळी किती व्यक्तींना प्रवेश दयावा त्याबाबत निर्बंध लादणे आवश्यक राहील .
स्पा : 50 टक्के क्षमतेन सुरू ठेवण्यास परवानगी राहील.
रोज रात्री 10 ते सळाळी 7 पर्यंत बंद राहतील.एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील.स्पा चालकानी कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे तसेच सर्व कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक असेल.या आस्थापनांमध्ये फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यासाठी कोणालाही मास्क काढण्याची गरज असणार नाही.या आस्थापनेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण (दोन डोस) झालेले असावेत.
अंत्यसंस्कार / अंत्यविधी : अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणा-या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा असणार नाही.
समुद्र किनारे, बागा, उद्याने : सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत सुरू राहतील. सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. पर्यटकांनी कोव्हीड अनुरूप वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील.
करमणूक / थीम पार्क : सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत सुरू राहतील. सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. पर्यटकांनी कोव्हीड अनुरूप वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील.
जलतरण तलाव, वॉटर पार्क : 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणेस परवानगी राहील. सर्व ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. येथे येणा-या सर्व नागरिकांनी व सेवा देणारे यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. सेवा देणा-या कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील.
रेस्टॉरंट्स , उपहारगृहे : 50 टक्के क्षमतेनेच कार्यरत राहतील. सर्व अभ्यागतांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची अभ्यागतांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक राहील. फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तीनांच प्रवेश देण्यात यावा. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील. दररोज घरपोच सेवेस परवानगी राहील.
नाटयगृहे, चित्रपटगृहे : 50 टक्के क्षमतेनेच कार्यरत राहतील. सर्व अभ्यागतांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची अभ्यागतांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक राहील. फक्त लसीकरण पुर्ण झालेल्या व्यक्तीनांच प्रवेश देण्यात यावा. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
भजने, इतर सर्व स्थानिक सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम : सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के एवढया लोकांना परवानगी राहील. लग्नसमारंभ : बंदिस्त सभागृहामध्ये जास्तीत जास्त 200 लोकांना परवानगी राहील. मोकळ्या जागेत जास्तीत जास्त 200 किंवा त्या जागेच्या प्रत्यक्ष क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल एवढया व्यक्तीना परवानगी राहील.
त्याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समुहाला रात्री 11.00 ते पहाटे 05.00 यावेळेत बाहेर फिरण्यासाठी लागू केलेली बंदी उठविण्यात येत आहे. जिल्ह्यातील स्पर्धात्मक खेळांना 25 % क्षमतेसह प्रेक्षकांना परवानगी राहील. जिल्ह्यातील स्पर्धात्मक खेळांना 25 % क्षमतेसह प्रेक्षकांना परवानगी राहील. ही क्षमता निश्चित केलेल्या एकुण आसन व्यवस्थेच्या 25 % असणे आवश्यक आहे. ठिकाणी प्रेक्षकांना उभे राहून आणि फिरुन गर्दी करणेस प्रतिबंध असेल. स्थानिक प्राधिकारणाने निश्चित केलेल्या वेळेनुसार व वाजवी निर्वधासह स्थानिक पर्यटन स्थळे खुली राहतील. या ठिकाणी कोविड अनुरूप वर्तनाचे नागरिकाकडून पालन केले जाईल. या बाबतची दक्षता संवधीत स्थानिक प्राधिकारण यांनी घ्यावी.
जिल्हयातील ग्रामिण भागातील आठवडा बाजार संबंधित स्थानिक प्राधिकारणाच्या परवानगीने घालून दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून सुरू करण्यास परवानगी राहील. जिल्हयातील शहरी भागातील आठवडा बाजार भरविताना खुल्या / मोकळया जागेत / मैदानात भरविण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत रत्याच्याकडेला किंवा रस्त्यालगत आठवडा बाजार भरविला जाणार नाही . दोन विक्रेत्यामध्ये पुरेसे सामाजिक अंतर ठेवून व कोविड १९ अनुषंगाने सर्व निर्बंधाचे पालन करणे बंधनकारक राहील. आठवडा बाजारात विक्री साठी येणा-या व्यवसायिकानी त्यांची बैठक व्यवस्था स्थानिक नगरपंचायत / नगरपालिका / नगर परिषद प्रशासनाकडून निश्चित करून घ्यावी. या ठिकाणी नागरी व व्यवसायिकांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करताना सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापर करणे तसेच वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक राहील. शहरी भागात आठवडा बाजार भरविण्यासाठी या बाबींची पुर्तता होत असल्याची खातरजमा करूनच आठवडा बाजार भरविण्याबाबत परवानगी देण्याबाबतची कार्यवाही संबंधीत मुख्याधिकारी यांनी करावयाची आहे.