दापोली : तालुक्यामध्ये भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकापेक्षा एक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.
आज पुन्हा एकदा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे माजी पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
मुंबई येथील रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर हा प्रवेशाचा कार्यक्रम थोड्यावेळात होणार आहे.
जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष संदीप केळकर यांनी या प्रवेशांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राकेश माळी, सागर तेली, पारस गुर्जर, ओंकार जैन, गजेंद्र माळी, प्रकाश तेली, रोहित शिंदे, संतू जैन, कन्हैयालाल सुतार, ऋषभ कांबळे, किरण बामणे, साई भांबीड, रोहन विचारे, कुणाल जाधव, मयूर गोरिवले, अजित बामणे, आनंद रेवाळे, आकाश मेवाडा, समीर कदम, रिंकू जयस्वाल, महेश बालगुडे, पृथ्वीराज शिंदे, अनंत रेवाळे, प्रसन्न बामणे, प्रसाद बामणे, राजेश बामणे, गणेश बामणे, शशिकांत बामणे आदी कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.