रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी मतदार संघातील रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान योजने अंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील युनिटी ट्युलिप इमारती बाहेरील सुलोचना रामचंद्र झगडे- कॉर्नर गार्डनचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

12 लाख रुपये खर्चून अतिशय सुंदर गार्डन उभारल्याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.

हे नावीन्य पूर्ण गार्डन नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र.५ मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सौरभ मलुष्टे यांनी या गार्डनच्या कामाकडे अतिशय बारकाईनं लक्ष दिलं होतं.

पूर्वी या ठिकाणी झुडपे वाढली होती. कचराही टाकला जात होता. आता या गार्डनमुळे परिसराला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनीही सौरभ मलुष्टेंचं कौतुक केलं. लोकप्रतिनिधी नसताना जी लोकं चांगलं काम करतात भविष्यात जनतेनं त्यांच्या पाठीशी राहणं आवश्यक आहे.

मला विश्वास आहे भविष्यात अशी लोकं चांगलं काम करतील. त्याबरोबर देशाच्या पर्यटनात रत्नागिरी शहर भर घालणार असल्याचा विश्वास देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, तालुका प्रमुख बाबू म्हाप, सुदेश मयेकर, मुख्य अधिकारी तुषार बाबर, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, निमेश नायर,वसंत पाटील, वैभवी खेडेकर, श्रद्धा हळदणकर, पूजा पवार, दीपक पवार, सौरभ मलुष्टे, प्रशांत सुर्वे, बारक्या हळदनकर,अभिजित दूडये, प्रभाग ५ चे सर्व पदाधिकारी आणि प्रभाग ५ मधील मतदार, बच्चे कंपनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.