रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. गुरूवारी (दि. २) जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीत २ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

दिवसभरात एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज ११ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून देण्यात आली.

तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी १
▪️ खेड १
एकूण २