दापोली: दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या साईप्रसाद उत्पल वराडकर याने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले.
याशिवाय, त्याने 1500 मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकही आपल्या नावावर केले. याच स्पर्धेत शाळेच्या सर्वेश रुपेश शिंदे याने 100 मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक प्राप्त केले.
साईप्रसाद वराडकर याची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडाशिक्षक सुहास नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष सुजय मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी साईप्रसादला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.