चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच चिपळूणमधील नामांकित व्यापारी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व संजय रेडीज यांचे गुरुवारी दिनांक 09 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झालं.
त्यांच्या निधनाने चिपळूण, रत्नागिरी आणि संपूर्ण सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय रेडीज यांनी आपल्या कार्यकाळात चिपळूण अर्बन बँकेच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे बँकेने प्रगती साधली आणि स्थानिक पातळीवर ग्राहकांचा विश्वास संपादन केला.
रत्नागिरी जिल्हा बँकेतही त्यांनी संचालक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि ज्ञान यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मान-सन्मान मिळाला.
व्यापारी म्हणूनही त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने आणि कार्यकुशलतेने चिपळूण परिसरात विशेष स्थान निर्माण केले होते.
संजय रेडीज यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक आधारस्तंभ हरपला आहे.
चिपळूणचे ज्येष्ठ सहकार नेते व प्रसिद्ध व्यापारी संजय रेडीज यांचे निधन
Similar Posts
View All
महिला बचत गटांसाठी खेडमध्ये २० कोटींचा ‘उमेद मॉल’ साकारणारमहिला बचत गटांसाठी खेडमध्ये २० कोटींचा ‘उमेद मॉल’ साकारणार
दापोलीत दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वर दीपावली’ संगीत मैफलीचे आयोजन
पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन; १४ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे यश अभिमानास्पद – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरीकरांचा प्रवास होणार सुखकर: एसटीच्या ताफ्यात १०४ नव्या बसेस दाखल, लवकरच धावणार ‘ई-शिवाई’

Leave a Reply