दापोली, २५ सप्टेंबर २०२५: घरातील जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज, रोजची धावपळ, मानसिक व शारीरिक ताण-तणाव यांचा समतोल साधताना दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने कार्यरत असलेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दापोलीच्या महिला आघाडीने विशेष गौरव केला. या गौरव सोहळ्याला तालुका महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी मोरे, तालुकाध्यक्ष संदीप जालगांवकर, संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवन सुर्वे, शिक्षक नेते अविनाश मोरे, आनंद रोहे, महेंद्र खांबल, विनायक तिमसेकर, बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, नरेंद्र जाधव, संदीप कातकर, दत्ताराम गोरीवले, सुरेश साबळे, महेश सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.

दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभाग कार्यालयात हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण विभागातील कर्मचारी मेघा पवार, सतिक्षा नांदगावकर, विद्या सार्दळ, सुनीता राठोड, दर्शना शिवगण, दिपाली जुवेकर, सुषमा तांबे, सोनल कादविलकर आणि ऋतुजा सांगडे यांचा अश्विनी मोरे, कविता मयेकर, मधुरा सोमण, सुप्रिया साबळे, अश्विनी थोरात, श्रद्धा कोंडविलकर, कविता पांढरे, शैला चांदोरकर, पूजा सुर्वे, नीशा गावीत, सायली तांबे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मोरे यांनी केले, तर संदीप जालगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले.