रत्नागिरी: १६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न आणि कृषी संघटनेची’ स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जवळपास १५० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्या संदर्भातील उपाय योजनांवर भर देण्यात येतो.

अन्न सुरक्षे बाबतची एकंदर परिस्थिती पाहता अन्न दिनाबाबत जागरूकता वाढीस लागण्याची गरज आहे. त्यामुळे दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते.

यावर्षी करिता ‘Water is Life, Water if Food, Leave No One Behind’ (पाणी हेच जीवन, पाणी हेच अन्न, पाण्याविना कोणीही वंचित राहू नये) अशी संकल्पना मांडली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेले सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र मार्फत दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो.

यावर्षी या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामधील ‘डीपार्टमेंट ऑफ लाईफ सायन्स’ आणि ‘फिशरीज ट्रेनिंग ऑफिस, पेठकिल्ला, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने ‘Importance of fish in human nutrition’ (माशांचे मानवी पोषण आहारामध्ये मध्ये महत्व) या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यावेळी सहभागी विद्यार्थी आणि मच्छिमार यांना ‘माशांचे मानवी पोषण आहारामध्ये मध्ये महत्व, टाकावू मासळी पासून पदार्थ बनविणे, व्हॅल्यू ॲडेड मत्स्य पदार्थ, सुकविलेली मासळी, आणि खेकडा वाढविण्याकरिता संच याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी डॉ. आशिष मोहिते, डॉ. ए.यु. पागरकर, डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले, डॉ. संतोष मेतर, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे, श्रीमती वर्षा सदावर्ते यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रथम उपस्थितांपैकी वेदराज गोसावी आणि मनीषा मौदि यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मिळालेल्या ज्ञानाबाबत आणि कार्यक्रमाच्या सुयोग्य व्यवस्थापन करिता आभार व्यक्त केलेत.

कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. ए. यु. पागरकर यांनी या यावर्षीची संकल्पना ‘पाणी हेच जीवन, पाणी हेच अन्न, पाण्याविना कोणीही वंचित राहू नये’ यावर मार्गदर्शन केले.

यावेळी ‘फिशरीज ट्रेनिंग ऑफिस, रत्नागिरी’चे जे.डी. सावंत आणि मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामधील ‘डीपार्टमेंट ऑफ लाईफ सायन्स’ च्या प्रा. तौफिन पठाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आशिष मोहिते यांनी सहभागींना प्रत्यक्ष अन्नप्रक्रिया संदर्भात व्यवसायामध्ये उतरण्याचे आव्हान केले. त्यांनी त्याकरिता आवश्यक लायसन्स कसे मिळवावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळा सहभाग प्रमाणपत्र वितरिक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए.यु. पागरकर यांनी, आभार प्रदर्शन डॉ. हरिष धमगये यांनी, आणि सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम यांनी केले.

या कार्यशाळेच्या आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक डॉ. ए.यु. पागरकर (प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (सहयोगी प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे (सहाय्यक संशोधन अधिकारी), डॉ. संतोष मेतर (अभिरक्षक), श्रीमती वर्षा सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ), श्री. रमेश सावर्डेकर (प्रयोगशाळा सहाय्यक) यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

तसेच जाई साळवी, सचिन पावसकर, मनिष शिंदे, महेश किल्लेकर, मंगेश नांदगावकर, सुहास कांबळे, राजेंद्र कडव, सचिन चव्हाण, प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, स्वप्नील आलीम, योगेश पिलणकर, अभिजित मयेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता विशेष सहकार्य केले.