Dapoli : १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली तालुक्यातील टाळसुरे आणि बोंडीवली येथे वनराई बंधारे बांधण्यात आले.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये या उद्देशाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे वनराई बंधारे उभारण्यात येत आहेत.

जालगाव येथील समर्थ बैठकीच्या सदस्यांनी एकत्र येऊन टाळसुरे बौद्धवाडी आणि बोंडीवली येथे हे बांधकाम केले. टाळसुरे येथे वनराई बंधारा बांधण्यासाठी ८५ सदस्य उपस्थित होते.
या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी टाळसुरे गावच्या सरपंच पूर्वा संदीप सपकाळ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच, बोंडीवली येथे मोनी नदीवर बंधारा बांधण्यासाठी ४७ सदस्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी बोंडीवलीचे सरपंच विजय पांडुरंग नांदे यांच्यासह उपसरपंच आणि इतर सदस्यांनी उपस्थित राहून या पाणीबचतीच्या उपक्रमाला सदिच्छा दिल्या.

Leave a Reply