रत्नागिरी : भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

देशाच्या जडणघडणीत भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply