गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

कशेडी घाटात एसटी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भरधाव दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला

कशेडी घाटात एसटी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भरधाव दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेले आणखी दोघेजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (23) रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास घडला. कशेडी टॅप येथील वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर एसटी डेपोचे चालक दत्ताराम महाडिक हे आपल्या ताब्यातील एसटी गुहागर ते मुंबई अशी घेऊन निघाले होते. काल रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास त्याची एसटी कशेडी घाटातील हॉटेल अनुसया येथे आली असता भरधाव वेगात घाट उतरणारी दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येऊन एसटीवर समोरून धडकली. या धडकेत दुचाकीचालक विजय प्रकाश जाधव (२१) रा. चोरवणे उत्तेकरवाडी हा जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलोले तुषार दीपक जाधव (२५) रा. चोरवणे उत्तेकर वाडी आणि रोहित रंगराव जाधव (२०) हा भरणे तालुका खेड हे दोघेही जखमी झाले. या अपघाताची नोंद खेड पोलिसांनी केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

ST-two-wheeler accident in Kashedi Ghat; Two-wheeler killed

Updated: 13 Jan 2026 8:50 PM

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *