मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

शिरगाव : येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून ओळखली जाणारी बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आदिवासी समाजाचे जल, जंगल आणि जमिनीवरील हक्क वाचवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आणि प्रेमाने ‘धरती आबा’ असे संबोधल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांना या वेळी अभिवादन करण्यात आले.

ब्रिटिश सत्तेविरोधात आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी आवाज उठवणाऱ्या बिरसा मुंडा यांचे भारतीय इतिहासातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे आणि बलिदानामुळे आजही लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य केतन चौधरी यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थितांना त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली

या वेळी उपस्थित विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी वर्गानेही प्रतिमेस पुष्प अर्पण करून बिरसा मुंडा यांना वंदन केले.

Birsa Munda Jayanti, Fishery Engineering Polytechnic, Janjatiya Gaurav Divas, Ketan Chaudhari, Maharashtra News, shirgaon, Tribal Rights

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *