Babasaheb Purandare | शिवशाहीर, साहित्यिक, नाटककार आणि वक्ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचं पुण्यात उपचार घेत असताना आज सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनीटांनी निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (pandit dinanth mangeshkar) उपचार सुरु होते.
काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरुन बाबासाहेब पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतरच्या काळात त्यांची प्रकृती चिंताजनक (critical) बनली होती. आज रात्री त्यांची प्राण ज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 साली पुण्यातील शिर्के वाड्यात झाला (shirke wada). बाबासाहेब पुरंदरे सरदार करण्याचे होते छत्रपती शिवाजी महाराजांवर (chhatrapati Shivaji maharaj असं त्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देशभरात हजारो व्याख्यानं दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती घराघरात पोचवण्याचे काम त्यांनी केलं आहे.
बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. 1954 पासून शिवचरित्र सांगायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे कधीही वळून पाहिलं नाही. गेल्या ऐंशी वर्ष त्यांनी हे काम अविरतपणे सुरू ठेवलं. शिवचरित्र या एकाच विषयावर सतत 80 वर्ष बोलणं हा एक प्रकारचा विश्वविक्रमच म्हणावा लागेल.
जाणता राजा या नाटकाच्या माध्यमातून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचवले. या नाट्याला महाराष्ट्राबरोबरच देश विदेशात ही पसंती मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल १९८४ रोजी ‘जाणता राजा’ या महानाट्याचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला होता. भारतातील अनेक राज्यं आणि अमेरिकेत मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून या महानाट्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत; त्यामुळं विविध संस्था, संघटना आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये संयोजक संस्थांना मिळाले.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या अशा जाण्याने महाराष्ट्राची हानी झाली आहे. अनेक मान्यवर मंडळींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.