बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

राज ठाकरे यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे

राज ठाकरे यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र

मुंबई– महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावं तसंच खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी, अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.

राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात करोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाउन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही असं मत व्यक्त केलं आहे. राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. यासोबत सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी तसंच करोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

सर्व वयोगटातील लोकांचं लसीकरण
“काेरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray write a letter to Prime Minister Narendra Modi

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *