Covid

रत्नागिरी / प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ४० रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. कोरोना रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करू पाहतंय पण घरा बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीत १४, कामथेमध्ये १९, गुहागरमध्ये ५ आणि कळंबणीमध्ये २ पॉझिटिव्ह आढळले आहे. दापोलीकरांना आज दिलासा मिळाला आहे.

याचे  विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी            14
कामथे               19
गुहागर               05
कळंबणी(खेड)   02

जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांचा आकडा आता 1658 इतका झाला आहे. २००० रूग्णांकडे जिल्ह्याचा आकडा झेपावता दिसत आहे. कोरोना संकट एवढ्यात तरी टळेल अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाहीये. स्वतःला सुरक्षीत ठेवणं आता प्रत्येकाची जबाबदारी आहे.

याच काळात दिलासा देणारी बातमी म्हणजे जिल्ह्यातून ३० रूग्णांना बरे झाल्यानं सोमवारी घरी सोडण्यात  आलं आहे. त्यामुळे बरे झालेल्या रूग्णांचा आकडा देखील हजारच्या वर पोहोचला आहे. हा आकडा १०८४ इतका आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या ३० जणांचं विवरणही आम्ही खाली देत आहोत.

घरडा 19
समाज कल्याण 7
कामथे 3
रत्नागिरी 1

सध्या ३७३ रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत तर २० जणं होम आयसोलेशनमध्ये आहेत. ११ रूग्ण अधिक उपचारासाठी जिल्ह्या बाहेर गेलेले आहेत.

रुग्णालयात दाखल – 373
होम आयसोलेश – 20
*उपचारासाठी इतर जिल्ह्यात– 11

– माय कोकण