व्हिजन दापोली अंतर्गत घेण्यात आली होती परीक्षा

दापोली : व्हिजन दापोली २०२३-२४ अंतर्गत VDS-IV (इ. ४ थी) शिष्यवृत्ती अंतिम परीक्षा केंद्रावर दिनांक १६/०४/२०२४ रोजी २७ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. पं. स. दापोली गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सदर परीक्षेचा नुकताच घोषित केला. यामध्ये हर्णे उर्दू शाळेचा अदनान लुकमान कुरवले याने ३०० पैकी २८८ गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर बुरोंडी उर्दूच्या अय्यान असिफ पठाण याचेसह देगाव शाळेच्या मिहीर महेश घाणेकर या दोघांनी २७० गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला;तर शिरखल ओलवणच्या ऋग्वेद दत्तप्रसाद गूरव याने २६८ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.

निकाल घोषित करण्या पुर्वसंध्येला गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, सहाय्यक गटविकास अधिकारी
सुनिल खरात, अण्णासाहेब बळवंतराव, व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय शिरसाट, सचीव – सुनिल कारखेले, विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, बळीराम राठोड तसेच व्हिजन दापोली मुख्यसमितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत निकालपत्राचे प्रकाशन करण्यात आलं.

यावेळी गणेश मंडलीक यांनी मुलं ही आपली संपत्ती आहे. त्यांच्यावर नियोजनपूर्वक लक्ष केंद्रित केल्यास जिल्हा परिषद शाळांचा विकास नक्कीच होईल व पटसंख्याही वाढेल असे मत व्यक्त केले.

या परीक्षेत ५० विद्यार्थी निश्चिती करण्यात आले असून प्रभाग, केंद्र, शाळा निहाय निकाल यासोबत देण्यात येत आला.

सदरचा निकाल संबंधित विद्यार्थी, पालक, SMC यांच्या निदर्शनास आणून देणेत यावा व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी चे शाळा स्तरावर सत्कार व अभिनंदन करण्यात यावे.

अशा सुचनाही तालुका गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दिल्या असून, तालुका स्तरावर लवकरच गुणवंत विद्यार्थी, शाळा यांच्या यथोचित सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाईल असे सांगून त्यांनी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, पालक यांचे अभिनंदन केले.