दापोली: धर्मवीर छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान दापोली यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

श्रींच्या भव्य पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये हे सर्व स्पर्धक सहभागी झाले होते. या निमित्ताने दापोलीकरांना विविध प्रकारच्या ऐतिहासिक वेशभूषा पाहण्याची संधी मिळाली.

या स्पर्धेत झाशीच्या राणीची वेशभूषा सादर करून निहारिका आनंदकुमार हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका जयाताई साळवी, मंडळाचे अध्यक्ष राकेश भांबिड, उपाध्यक्ष राजेंद्र आंबेकर, सचिव राजू पिंपळे, खजिनदार प्रमोद पांगारकर, सचिन गायकवाड आणि मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकाला रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.